एस्को मॉडेल वर आधारीत रस्त्यांवरील एलईडी लाईट्स

LED Street Lighting – 5
LED Street Lighting – 4
LED Street Lighting – 3
LED Street Lighting – 2
LED Street Lighting – 1

 

एकूणच प्रकल्प पूर्ण

पारंपारिक सोडियम व्हेपर दिच्यांपैकी 7500 रस्त्यांवरील दिवे बदलून त्या ऐवजी एलईडी लाईट्स बसविन्यात आले आहे. या घटनेचे लोकांनी स्वागत केले असल्याचे सिध्द झाले आहे. याच कामानुसार तसेच यांतून निघालेल्या सकारात्मक निष्कर्शानुसार ठाणे महानगरपालिकेने आता रस्त्यांवरील दिव्यांच्या कामात उर्जा बचत करणाऱ्या दिव्यांमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. शहरात चांगली आणि कार्यक्षम लायटिंग सिस्टम मुळे शहराच्या सौंदर्यात वाढ तर होईलच पण स्थानिक लोकांच्या सुरक्षेतही वाढ होईल. या प्रकल्पाच्या वाढीमुळे लोकांना देण्यात येणार्‍या सुविधांमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडून स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम शहरी सुविधा प्राप्त होण्याबरोबरच खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढून शहरात चांगले सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बदल घडण्यास मदत होईल. ठाणे महानगरपालिकेने ICLEI- लोकल गव्हर्मेंट फॉर सस्टेनेबिलिटी- साऊथ एशिया बरोबर काम करून त्यांच्या लो एमिशन डेव्हलपमेंट मध्ये सहकार्य केले आहे. त्यांचा हा प्रकल्प “डेव्हलपिंग अर्बन लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज इन इमर्जिंग इकोनॉमिज (अर्बन लीड्स) कडून सुरू करण्यात आला असून या प्रकल्पाच्या आरवणीस वित्तीय सहकार्य हे युरोपियन युनियन ने केले आहे. तसेच या प्रकल्पाला यूनएन-हॅबिटॅट कडून सहकार्य करण्यात येत आहे. अर्बन लीड्स प्रकल्पाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर कमी उर्जा वापरणारी एलईडी उपकरणे त्यांच्या एस्को मॉडेल अंतर्गत बसवण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून उर्जेचा वापर कमी करून महानगरपालिकांच्या सेवामुळे होणार्‍या ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करणे.

नागरिकांना होणारा लाभ

    • ठाणे शहरातील नागरिकांना साधारणपणे स्विकारल्या जाणार्‍या निकषांनुसार अधिक चांगली आणि कार्यक्षम पदपथांवरील दिव्यांची सुविधा देणे

 

    • उर्जेची बचत करणार्‍या उपकरणांचा वापर करून ग्रीन गॅस उत्सर्जन कमी करणे कार्बन फूट प्रिंट कमी करणे.

 

  • कार्बन फूटप्रिंट कमी करणे.

प्रकल्पाची सद्यस्थिती काम पूर्ण

निविदा प्रसिद्ध दिनांक : 09/12/2015
सद्यस्थिती: काम पूर्ण
कार्यादेश दिनांक: 23/12/2016
ठेकेदाराचे नाव : M/s. Karnataka State Electronics Development Corporation
मंजुर निविदा रक्कम: INR. 15 Cr
प्रकल्पाचा कालावधी : 7 Months
भौतिक प्रगती: 100%
आर्थिक प्रगती : 66.67%
Expenditure Till Date:  

Comments are closed.